खळबळजनक ! लिफ्टच्या बहाण्याने 45 वर्षीय महिले बलात्कार करून लाखाचे दागिने लुटले, मुंढवा पोलीसांनी केले 24 तासात अटकु

पुणे : - भल्या सकाळी लिफ्टच्या बहाण्याने एका 45 वर्षीय महिलेला एका अज्ञात ठिकाणी नेहून बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तर बलात्कारानंतर नराधम महिलेचे 1 लाखाचे दागिने घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात राजेश कांबळे नाव सांगणार्‍या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती, त्यानुसार मुंढवा पोलिसांनी 24 तासात सदर व्यक्ती अटक केली आहे. पोलिसांनी दिलेप्या माहितीनुसार, दिनांक 02/08/2020 रोजी सकाळी 08/15 वा.चे सुमारास एक 45 वर्षीय महिला फातिमानगर सोलापुर रोड येथील बसस्टॉपवर लोणी काळभोर येथे जाणेसाठी थांबली असताना, तेथे एक इसम दुचाकी वाहनावर आला व त्याने त्याचे नाव राजेश कांबळे असे सांगुन सदर माहिलेस लोणी काळभोर येथे सोडतो असे म्हणुन सदर महिलेस त्याचेकडील दुचाकीवरून मुंढवा मार्गे एबीसी रोडवर घेवून आला व त्याने मॅरेज हॉलमध्ये एका लहान खोलीत सदर महिलेवर बलात्कार केला. त्यावेळी फिर्यादीने तिचे अंगावर असणारे किंमत रुपये 1 लाख 05 हजारचे सोन्याचे दागीने काढन आरोपीने त्याचे हातरुमालात बांधले व सोबत घेवन गेला. त्याबाबत फिर्यादी महिलेने दिलेले फियांदीवरून तथाकथीत राजेश कांबळे याचेविरूध्द मुंढवा पोस्टे पुणे येथे गु.र.नं. 479/2020 भा.द.वि.क 376,379 या प्रमाणे गुन्हा दाखल आहे.  सदर गुन्हयाचे अनुषंगाने मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सलीम चाऊस यांनी केलेल्या मार्गदर्शनानसार तपासपथकाचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. विजय चंदन यांनी केलेल्या तपासात सदरचा गुन्हा हा इसम नामे दशरथ बनसोडे रा. काळेपडळ हडपसर पुणे याने सदरचा गुन्हा केल्याची बातमीदाराकडुन माहीती मिळाली. त्यानुसार सपोनि चंदन हे तपासपथकातील कर्मचारी यांचेसोबत वर नमुद आरोपीचा काळेपडळ भागात शोध घेत असताना त्याना सदरचा इसम हा विशाल पार्क, काळेपडळ, हडपसर पुणे येथुन जाताना दिसला. त्यानंतर त्यांनी सदर इसमांस ताब्यात घेवुन मुंढवा पोलीस स्टेशन येथे आणल्यानंतर त्यांचेकडे सखोल तपास करता, त्याने त्याचे नाव दशरथ रामचंद्र बनसोडे वय 53 वर्ष रा. बिल्डींग नं 1, प्लॅट नं 2, विशालपार्क, काळेपडळ, हडपसर, पुणे असे सांगुन त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. म्हणुन त्यास नमुद गुन्हयात दि. 03/08/2020 रोजी 17/30 वा. अटक करण्यात आलेली आहे. वर नमुद गुन्हयातील वर नमुद आरोपी याने सदरचा गुन्हा केल्यानंतर त्याने त्याचा स्वताचा कोणताही पुरावा मागे शिल्लक ठेवलेला नव्हता.  तपास यंत्रणेने तपासाची बुध्दी कौशल्य वापरुन वर नमुद आरोपीस 24 तासाचे आत पकडुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदरची कामगिरी ही, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सुनिल फुलारी साो, पोलीस उपायुक्त परि.5 पुणे मा. श्री. सुहास बावचे साो. सहा.पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे मा.श्री.कल्याणराव विधाते साो, मुंढवा पोस्टेचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांचे मागदर्शनाखाली, सहा.पोलीस निरीक्षक विजय चंदन, सपोनि पंडीत रेजीतवाड, म.पो.उपनिरी शुंभागी नरके, मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पांडुरंग पवार, दत्ता विभुते, दिपक कांबळे, दिनेश राणे, महेश पाठक अमोल गायकवाड यांनी केली आहे. 


Popular posts from this blog

गरजूंना रोज २२०० अन्न पाकिटे पुरविणारे कोरोना योध्ये ठरताहेत पुण्यातील आदर्श

खडकी शिक्षण संस्थेने नव्याने बांधलेल्या ‘स्व.चंद्रकांत मोहनलाल छाजेड सभागृहाचे उद्घाटन 14 मार्च रोजी