खडकी शिक्षण संस्थेने नव्याने बांधलेल्या ‘स्व.चंद्रकांत मोहनलाल छाजेड सभागृहाचे उद्घाटन 14 मार्च रोजी
खडकी शिक्षण संस्था ज्ञानदानाचे कार्य 106 वर्षापासून अव्याहतपणे करीत आहे. या परिसरातील गरीब,गरजू व दुर्बल घटकंासाठी विविध प्रकारचे उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. संस्थेच्या 10 शाखा एकाच प्रांगणात असून मराठी व इंग्रजी माध्यमातून सुमारे 6000 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.बालवाडी पासून पदव्युत्तर पर्यंत,रात्रप्रशाला,चित्रकला महाविद्यालय,मराठी माध्यमासाठी दोन ई-लर्निंग वर्ग, तसेंच 5 डिजीटल वर्ग अशा विविध माध्यमांद्वारे अदययावत सुविधांव्दारे अध्यापन केले जाते.
संस्थेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यवसाय, कला व क्रीडा व इतर क्षेेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून गरूडझेप घेतली आहे व त्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. माजी पर्यटन राज्यमंत्री आदरणीय स्व.चंद्रकांतजी छाजेडसाहेब हे संस्थेचे चिटणीस म्हणून 42 वर्षे कार्यरत होते. संस्थेचेे तत्कालीन अध्यक्ष मा. अॅड्.एस.के. जैनसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब,दुर्बल घटकांतील गरजूंना शिक्षणासाठी प्रेरित करून शिक्षण व रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी सतत प्रयत्न केले केले.संस्थेच्या विकासात भरीव योगदान देऊन अनेक शाखांची मान्यता आणण्याचे काम स्व.चंद्रकांतजी छाजेडसाहेब यांनी केले. संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र ते आयुष्यभर झटले. त्यांच्या या अविस्मरणीय व अजोड कार्यांची स्मृती जपण्यासाठी संस्थेने नव्याने बांधलेल्या सभागृहास त्यांचे नाव देण्याचे ठरविले आहे. या नामकरण समारंभास मा.गिरीषजी बापट साहेब-खासदार, पुणे शहर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सेमी इंग्रजी शाळेत (बालवाडीत) शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी स्व.तुकाराम भापकर बालोद्यानाचे उद्घाटन मा. विश्वजीतजी कदमसाहेब-राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते होणार आहे.
संस्थेच्या अद्ययावत रायफल शुटींग रेंजचे उद्घाटन संस्थेचे मानद अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. एस.के.जैनसाहेब यांचे हस्ते होणार आहे. खडकी परिसरातील गोरगरीब खेळांडूसाठी उभारण्यात आलेल्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन आमदार मा.सिद्धार्थजी शिरोळे यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मा. प्रमोदजी सिंग सीईओ खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, उपाध्यक्ष मा. दुर्योधनजी भापकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास शहरातील माजी मंत्री, आजी-माजी महापौर आमदार, आजी-माजी नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक व स्व.चंद्रकांतजी छाजेडसाहेब यांचे आप्तेष्ट व मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सर्व संचालक,अध्यापक, पालक प्रतिनिधी यांनी केले आहे.
कार्यक्रमाची वेळ- दु. 4.30 वा.
स्थळ- खडकी शिक्षण संस्था प्रांगण
अशी माहिती खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल व सचिव श्री. आनंद चंद्रकांत छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विलासराव पंगुडवाले, सहसचिव शिरिष नाइकरे, संचालक राजेंद्र भुतडा, ज्ञानेश्वर मुरकुटे, रमेश अवस्थे, महादेव नाईक, मुख्याध्यापक राजेंद्र अवधूतकर, पालक प्रतिनिधी कैलास टोणपे आदी मान्यवर उपस्थित होते.